September 21, 2024

राज्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता !

0
Contact News Publisher

मुंबई : राज्याच्या येत्या पाच दिवसात विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Meteorology-department)
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात शनिवार (१८ मार्च) पर्यंत पावसाची शक्यताआहे. तुफान वारा, वादळ सदृश परिस्थिती आणि विजांच्या कडकडाटाची परिस्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी घराबाहेर न पडण्याचा तसेच जलाशय आणि विजेचा धक्का बसण्याचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे.इतकेच नाही तर द्राक्ष आणि केळ्यांच्या पिकांना आडोसे देण्याची तसेच कोणत्याही पिकांना सिंचन किंवा रासायनिक खतांची फवारणी न करण्याची सूचना हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे तर सर्वात कमी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदवण्यात आले आहे. १४ ते १८ मार्च या कालावधीत कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असेही हवामान खात्याच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending