“वेरूळ पर्यटनअभ्यागत केंद्रात विक्रेत्यांचे पुनर्वसन करा”अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा

“वेरूळ भोसले चौक ते माटेगाव चौफुली रस्ता बनवून देण्याची मागणी”
खुलताबाद तालुका कृषी अधिकारी अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात!
“वेरूळ परिसराला अवकाळी ने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान”
वेरूळ येथील विविध वस्तू विक्रेत्यांचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील पर्यटनअभ्यागत केंद्रात उपलब्ध असलेले गाळे देऊन पुनर्वसन करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पक्षाचे युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन सोमवारी करण्यात आली.
खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी
crop insurance list : हेक्टरी २७ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर : पहा यादीत नाव
निवेदनात म्हटले आहे की, वेरूळ येथील एलोरा हॉटेल्स अँड शॉपकीपर ओनर असोसिएशन चे सदस्य गेल्या 40 ते 50 वर्षांपासून वेरूळ लेणी समोर पुस्तक विक्री केंद्र, हस्तकला केंद्र, चहा, उपहारगृह, रेस्टॉरंट,विविध वस्तू विकून गेल्या अनेक दशकांपासून आपली उपजीविका भागवत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत्या असलेले पर्यटन अभ्यागत केंद्र या ठिकाणी येथील स्थानिक विक्रेत्यांसाठी गाळे, उपहारगृहे, हस्तकला केंद्र उपलब्ध आहेत. तरी या कामी आपण लवकरात लवकर लक्ष घालून येथील असोसिएशनच्या सदस्यांचे पुनर्वसन करावे. कारण गेल्या एक महिन्यांपासून येथील विक्रेत्यांची दुकाने व उपहारगृहे उपजीविकेचे साधन हिरावल्याने ते हतलब झाले आहेत. त्यांचे त्वरित पुनर्वसन करावे.
घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा
जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record
तसेच धुळे सोलापूर महामार्गालगत असलेल्या माटेगाव चौफुली ते भोसले चौक या ठिकाणी असलेला एक किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेला आहे शिर्डी व दिल्ली, मुंबईहून येणारे पर्यटक याच मार्गाने येत असल्याने वेरूळसह पर्यटन स्थळाचे नाव या एक किलोमीटरच्या रस्त्यामुळे खराब होते. पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तसेच सदरील रस्ता लवकरात लवकर बनवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नसता आम आदमी पक्षाच्या वतीने वेरूळ लेणीसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, महिला जिल्हाध्यक्ष मेघा राईकवार, जिल्हा सचिव दत्तू पवार, संघटनमंत्री संजय चव्हाण, गोरखसिंग जारवाल, ज्ञानेश्वर बोरसे, अतुल निकम, गणेश वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Annasaheb patil loan scheme : उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन
जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात