September 21, 2024

खुलताबाद-कागजीपुरा येथे बालविवाह रोखला; पोलीस प्रशासन घटनास्थळी..

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा येथे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे खुलताबाद तालुक्यातील कागजिपुरा येथे सोळा वर्षीय अल्पवयीन असलेल्या मुलीचे लग्न एका एकवीस वर्षीय मुलासोबत लाऊन देण्याचा प्रकार समोर आला. सदरील घटनेची महिती मिळताच पोलीच निरीक्षक भुजग हातमोडे, बाल प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, गावचे सरपंच यांनी तात्काळ भेट देऊन सदर बालविवाह रोखला आहे, ही घटना सोमवार दिनाक 03 एप्रिल रोजी घडली आहे, सदरील घटनेची महिती खुलताबाद येथील अज्ञात व्यक्तीने खुलताबाद पोलिस ठाणेला कळवली .

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

सदर घटनेची महिती मिळताच पोलिस निरीक्षक भुजग हातमोडे , बालविकास प्रकल्प अधिकारी सविता बिक्कड, पोलिस नाईक, महिला पोलिस शिपाई, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या आई वडिलांचे समुपदेशन करून मुलीचे वय अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर च तिचे लग्नं करावे असा बहुमोल सल्ला दिला व सदर बालविवाह रोखला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सविता बिककड, पोलिस निरीक्षक श्री भुजंग हात मोडे, हेड कॉन्स्टेबल किशोर गवळी, पोलिस नाईक, पर्यवेक्षिका आर एस पाटील, सरपंच शेख अहमद, सेविका आशा जाधव, बालसंरक्षण अधिकारी श्री बमनाथ उपस्थित होते.

खुलताबाद तालुक्यातील सर्व तलाठी-मंडळाधिकरी कार्यलयला मिळणार हक्काची इमारत; प्रस्ताव मागविले

Pan Card : मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि.. शिक्षा..

CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending