September 21, 2024

खुलताबाद- वेरूळ घाटात एसटी बसचा अपघात!

0
Contact News Publisher

चालकाच्या सावधानतेमुळे वाचला प्रवाशांचा जीव

  • क्राईम टाईम्स टीम
  • सतीश लोखंडे

वेरूळ येथील घाटामध्ये शुक्रवार दिनांक 28 रोजी सायंकाळी सात वाजता एसटी बसचा अपघात झाला व चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत गाडी सुखरूप बाजूला केल्याने बसमधील 33 प्रवासी बालंबाल बचावले.

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ घाटामध्ये औरंगाबाद येथून कन्नड कडे जाणारी राज्य महामंडळाची बस क्रमांक एम एच ४० एम ९७४६ चे चालक पी.के. अवाले हे औरंगाबाद येथून खुलताबाद मार्गे कन्नड ला घेऊन जात होते. त्यातच खुलताबाद परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने येथील रस्ते वर पाणी जमा झाले होते व घाटातून वळणावरून जात असताना बस चे चाक स्लिप झाले व बस कडाला जात असताना वाहक पी.के अवाले यांनी मोठ्या शिताफीने बसवर नियंत्रण मिळवून घाटात साईटला असलेल्या डीवाईडरवर बस थांबवली. यात बसचे समोरील भागात थोडेफार नुकसान झाले. मात्र बसमधील 33 प्रवाशांचा जीव बालंबाल बचावला. तसेच वाहक एस. सी बाळशेटे यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवून देत प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून दिले.

उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending