September 21, 2024

सोलापूर धुळे हायवे ला जोडणारा वेरूळ बायपास बनला मृत्यूचा सापळा

0
Contact News Publisher

वेरूळ-माटेगाव चौफुलीवर महिला ट्रक खाली चिरडून जागीच ठार

  • क्राईम टाईम्स टीम
  • सतीश लोखंडे

वेरूळ येथील रहिवासी माया बाबासाहेब ढीवरे 36वर्षे ही वेरूळ कडे येत असताना सोलापूर धुळे महामार्गावरील माटेगाव चौफुली वर रस्ता ओलांडताना समोरून जोरात येणारा ट्रक न दिसल्यामुळे माया ढीवरे या ट्रकच्या मागच्या चाका खाली चिरडून जागीच ठार झाली.

अपघात होताच वेरूळचे ग्रामपंचायत सदस्य शेख मासियोद्दिन आणि त्यांचे सहकारी यांनी अपघातग्रस्त मदत करून अपघातामध्ये झालेले महिलांचे मेंदूचे तोंडाचे हाताचे तुकडे गोळा करून एका ठिकाणी एकत्र करून त्या महिलेला स्वतः हाताने ॲम्बुलन्स मध्ये टाकून पुढील कार्यवाही शव विच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले.

झालेल्या अपघाताची माहिती मिळताच वेरूळची पोलीस पाटील रमेश ढीवरे यांनी तात्काळ खुलताबाद पोलीस स्टेशनला कळवले असता पोलीस जमादार रितेश आव्हाड आणि विनोद बिघोत यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील ट्राफिक सुरळीत करून झालेल्या अपघाताचा पंचनामा केला.गेल्या दोन वर्षापासून नुकताच नवीन झालेला सोलापूर धुळे महामार वेरूळ ला जोडणारा वेरूळ- माटेगाव चौफुली रोड या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून अनेकांना येथे जीव गमवा लागला आहे.

मागे चौफुली आणि पुढे उड्डाणपूल.
सोलापूर धुळे महामार्गाचा झालेला उड्डाणपूल चुकीचा तयार करण्यात आला आहे. याची बांधकाम विभागाने कसा तयार केला याची चौकशी व्हावी असे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा प्रश्न पडला आहे. या उड्डाणपुलाची पाहणी प्रत्यक्ष आयुक्तासह कलेक्टरने करावी अशी मागणी सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर यांनी केली आहे.

खरं तर चौफुलीच्या पुढे बांधण्यात आलेला उड्डाणपूल हा काहीच कामाचा नसून तो उड्डाणपूल हा या चौफुलीवरच आवश्यक होता. ह्या चौफुलीवर उड्डाणपूलाची खूप गरज असून येथे उड्डाणपूल नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी अनेकांना जीव गमावा लागला आहे.

अंडर बायपास करणे गरजेचे
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम केले आहे. त्यामुळे नागरिकांचा नाहक जीव जात असून वेरूळ माटेगाव चौफुली वर अंडरपास करणे गरजेचे आहे. जर अंडरपास केला असता तर आज या गरीब महिलेचा जीव गेला नसता.
सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर
आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी औरंगाबाद

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending