September 21, 2024

दारूच्या कारणावरून टाकळी राजेरायत हत्या!; आरोपी अटक; ३०२सह गुन्हा दाखल

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे दोन तरुण भावांनी गावांतील बबन देवमन कुचे यांना चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ८च्या सुमारास घडली आहे.पोलिसाच्या माहिती प्रमाणे बबन देवमन कुचे दारू विक्रते आहेत दारूच्या कारणावरून बाचाबाची झाली दोन्ही आरोपी सख्या भावांनी बबन देवमन कुचे यांना चाकूचे वार करून हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी माहीती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस कर्मचारी मनोज घोडके, पोलीस नाईक उत्तम खटके, पो.कर्मचारी ताटे यांनी घटनास्थळी धाव घेत सखोल चौकशी करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. 302 सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यांत आले असता एका आरोपीला बाल कारागृहात पाठवण्यात आले आहे तर दुसऱ्या आरोपीचा दोन दिवसांचा पी.सी.आर देण्यात आला आहे.

खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजग हातमोडे अधिक तपास करीत आहेत तर पोलीस कर्मचारी मनोज घोडके,पोलीस कर्मचारी उत्तम खटके सहकार्य करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending