September 21, 2024

10th Result : दहावीचा निकाल लागला; येथे क्लिक करून निकाल पहा

0
Contact News Publisher

इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे लागून राहिले आहे. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.  सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचे लक्ष लागले आहे.

दुपारी १ वाजता नंतर बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आणि http://ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
तर इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या http://mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा. यावर क्लिक करताच SSC Examination February- 2023 RESULT अशी लिंक दाखवण्यात येईल. यावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाकण्यासाठी पर्याय असतील. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकताच निकाल स्क्रिनवर दाखवण्यात येईल. हा निकालाची प्रिंट देखील विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. यंदा २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ने कमी झाली असल्याची माहिती समोर आली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending