September 21, 2024

Requirement Forest bharti : वनविभागामध्ये सर्वात मोठी भरती; येथे क्लिक करुन अर्ज करा

0
Contact News Publisher

वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

Location Tracker by Mobile Number : मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन (चेक करा) बघा

अर्ज करण्याची मुदत
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत
दिनांक १०/६/२०२३ दिनांक ३०/६/२०२३

भरतीकरीता उपलब्ध पदे व वेतनश्रेणी :-
अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी भरतीकरीता एकूण उपलब्ध पदे
1 वनरक्षक (गट-क) S-७ : रु. २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) २१३८

खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी

शैक्षणिक पात्रता :-
३.१ उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भुगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
३.२ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

३.३ माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
३.४नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)

३.५ अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
३.६ मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

 

👉येथे क्लिक करून अर्ज करा👈

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending