September 21, 2024

“वासुदेवाने भरवली वेरूळची जिल्हा परिषद शाळा”

0
Contact News Publisher

“वासुदेव आला रे वासुदेव आला”

  • क्राईम टाईम्स टीम

वेरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर मोर पिसांची टोपी त्यावर रुद्राक्षाची माळ, आहात टाळ आणि चिपळ्या कपाळभर चंदनाचा गंध, खांद्यावर झोला, आणि अंगभर पांढरेशुभ्र कपडे परिधान करून हरिनामाचा जागर करत वासुदेव आला रे वासुदेव आला म्हणत येथे आलेल्या वासुदेवाने वेरूळची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरवली. यावेळी उपस्थित बाळ गोपाळांसह सर्वजण आनंदून गेले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे वेरूळकर यांनी वासुदेव महेश वाकोडे व अभिजीत गोंडे यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना वासुदेव समाजाची परंपरा, इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवांनी केलेले गुप्त हेराचे काम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

वासुदेव महेश वाकोडे व अभिजीत गोंडे यांनी पारंपारिक अभंग, भजन म्हणून दाखविले. तसेच समाज प्रबोधनपर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पालक शेख रियाज, मुख्याध्यापिका संगीता पांडे, सहशिक्षिका छाया माळी, सुरेश बोरसे, रेणुका मगर, वंदना बाविस्कर, अंजली कान्हेड, पल्लवी जयस्वाल, सीमा अन्नदाते, अर्चना चव्हाण, संगीता देशमुख, मनीषा उदावंत, छाया सोनवणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रामुख्याने भटक्या जमातीत असलेला वासुदेव समाज आता लोप पावत चाललेला आहे. आताच्या पिढीलाही भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास आणि वासुदेव समाजाची ओळख व्हावी म्हणून वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत खास वासुदेव महेश वाकोडे व अभिजीत गोंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. वासुदेव हे जरी आता परंपरागत व्यवसाय करत असले तरी त्यांच्याशी चर्चा करताना ते उच्च शिक्षित पदवीधर आहेत असे समजले. मात्र आपली संस्कृती आणि समाजाची असलेली नाळ आजही त्यांनी जपली असून समाजप्रबोधनाचे कार्य याद्वारे ते करत आहेत.

सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर
(अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती)
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वेरूळ.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending