September 21, 2024

जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य केल्याचा बाजार सावंगी आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिकारी यांना जिल्ह्यातील ‘द्वितीय’ पुरोस्कर

0
Contact News Publisher

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत सन २०२२ – २०२३ या वर्षात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आरोग्य केंद्रांतील वैधकीय अधिकाऱ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचा शासनाचा पुरोस्कर देण्यात येतो तर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक लोकसंख्या दिन 11जुलै 2023 निमित्ताने जिल्ह्यातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील वैधकीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर यावेळी जिल्ह्यातील द्वितीय क्रमांकाचा पुरोस्कर खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिकारी डॉ.अंजुम निलोफर यांना मिळाला आहे यावेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन डॉ. अंजुम निलोफर यांना गौरविण्यात आले आहे. तर यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण शिंदेसह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending