September 21, 2024

ऐकावे ते नवलचं !! प्रेयसींला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी तब्बल ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

0
Contact News Publisher

प्रेयसींना ‘इम्प्रेस’ करण्याच्या नादात अल्पवयीन मित्रांनी सुसाट माेबाइल चोरी सुरू केली. मुकुंदवाडीच्या गेट क्र. ५६ जवळ रेल्वेचा वेग मंदावताच दरवाजातील प्रवाशाचा मोबाइल खाली पाडून चोरायचे. असे एक दोन नाही तर ३०० पेक्षा अधिक मोबाइल त्यांनी चाेरले. मंगळवारी रंगेहाथ पकडल्यानंतर प्राथमिक चौकशीत चोरीचे ३८ मोबाइल मिळवण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले.

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; भरती’साठी लागणारे कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; समजून घ्या..

गाय म्हैस अनुदान योजना : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मुकुंदवाडी पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज मोरे यांना तिघे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सूचनेवरून मोरे यांनी रेल्वेस्थानकात सापळा रचला. तिघे येताच त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा नुकतेच चोरलेले तीन मोबाइल आढळून आले. मोरे यांच्यासह नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, शैलेश अडियाल, दिनेश राठोड, प्रभाकर पाटील यांनी ही कामगिरी केली.

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सायंकाळी सक्रिय
रेल्वेतून प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण काही दिवसांमध्ये वाढले होते. उस्मानपुरा ते चिकलठाण्याच्या तीन स्थानकांदरम्यान रेल्वेचा वेग मंदावतो. याच दरम्यान सायंकाळी येणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य केले जाई. एक चोर लांबून हातात मोबाइल असलेला प्रवासी हेरून पुढच्या दोघांना इशारा करे. मग एकजण तयार राहून काठीने हाताला झटका मारत मोबाइल खाली पाडून त्याचा झेल पकडत पसार होई. स्थानकावर झोपलेल्यांचे देखील ते मोबाइल लंपास करत.

औरंगाबाद: आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले!

1880 पासून जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

मोबाईल ५५ हजारांचा, विक्री पाच हजारांत
आरोपींमध्ये दोघे १७, तर एक १६ वर्षांचा आहे. वडील खासगी नोकरी तर आई, भाऊ केटरिंगमध्ये काम करतात. तिघेही नावाला विद्यार्थी असून, प्रत्येकाला एक, दोन मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर पैशांची उधळण करणे, महागडे मोबाइल दाखवून ‘इम्प्रेस’ करण्याचा छंद त्यांना जडला. शहरात ३८ मोबाइल विकले. इतर मोबाइल बीड, नांदेडच्या विक्रेत्यांना त्यांनी विकले. नुकताच लाँच झालेला एक ५५ हजारांचा मोबाइल त्यांनी अवघा ५ हजारांत एका मजुराला विकला.

PM Kusum Yojana: आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ -नवीन नियम वाचा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending