September 21, 2024

औरंगाबाद : तोतया ‘पीएसआय’चा अखेर भरला घडा!

0
Contact News Publisher

कधी चोरी करायचा तर कधी स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर ट्रु कॉलरला ‘पीएसआय शिंदे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे’ असे नाव सेट करुन पीएसआय असल्याचे भासवत दुकानदारांकडून हजारोंचे साहित्य घेऊन जायचा. अखेर त्याचा घडा भरला अन् तो पुंडलिकनगर पोलिसांच्या हाती लागला. त्या तोतया पोलिस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर नारायण देशमुख (३६, रा. पुंडलिकनगर, गल्ली क्र.२) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने पीएसआय असल्याचे सांगत अनेक जणांना फसविल्याचे समोर आले असून त्याच्याकडून दोन लाख चार हजार ७२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

फोटो व्हायरल करण्याची‎ धमकी देऊन फर्दापूर येथील हॉटेलवर युवतीवर बलात्कार

यासंदर्भात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांना चोरीच्या एका गुन्ह्यातील आरोपी गजानननगर मळ्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक आडे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणाहून संशयित देशमुखला उचलून आणत चौकशी केली असता, त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आले.

म्हैसमाळ येथे दोन प्रेम युगलांवर दामिनीसह विशेष पथक’ची कारवाई

यांनी केली कारवाईही कारवाई सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, गणेश डोईफोडे, जालींदर मांटे, संतोष पारधे, दिपक देशमुख, दिपक जाधव, अजय कांबळे, राजेश यदमळ, कल्याण निकम, संदीप बीडकर, निलेश शिंदे यांनी केली.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोण आहे आरोपी देशमुखआरोपी देशमुख याचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले असून त्याचे वागणे विक्षिप्त आहे. तो व्यसनही करतो. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली आहे. त्याच्याविरोधात त्याच्या भावजयीने कौटूंबिक छळ केल्याचा गुन्हाही दाखल केलेला आहे.खऱ्याखुऱ्या ‘पीएसआयला’ही लाजवेल असे कृत्यसचिन काळेंचे (३९) सिडको एन ४ येथे पद्मावती इंटरप्राईजेस नावाचे दुकान आहे. तीन जुलैरोजी सचिन दुकानात असताना अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आला आणि व्हिजिटींग कार्ड घेऊन गेला. अर्ध्या तासात तो परत आला आणि त्याने आपण पीएसआय शिंदे साहेबांचा चालक असून साहेब तुमच्या दुकानामागेच राहतात असे सांगत घरी दोन इन्वर्टर, दोन बॅटऱ्या मागितल्या. नंतर किंमत काढून लिहून घेत निघून गेला.

Location Tracker by Mobile Number : मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन (चेक करा) बघा

त्यानंतर एका मोबाईलच्या ट्रु कॉलरला पीएसआय शिंदे एम वाळूज पोलिस ठाणे असे नाव असलेल्या क्रमांकावरुन फिर्यादी काळेंना फोन आला. पीएसआय शिंदे बोलत असल्याचे सांगत चालक माऊली पाटील याच्याकडे दोन इन्‍व्हर्टर द्या असे म्हणाला. त्यावर फिर्यादीने सध्या एकच उपलब्ध आहे असे सांगत चालकाकडे २० हजार ३०० रुपयांचे इन्‍व्हर्टर, बॅटरी दिली. आरोपीनेही ती रिक्षात नेली.

सावधान!! औरंगाबाद शहरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट आढळल्यास होणार गुन्हा दाखल

उर्वरित साहित्य दुसऱ्या दिवशी द्यावयाचे असल्याने फिर्यादीने बील बनवून स्वतःजवळच ठेवले. दुसऱ्या दिवशी ४ जुलैला पुन्हा संबंधित ट्रु कॉलरवर नाव असलेल्या क्रमांकावरुन फिर्यादीला फोन आला.

त्याने आपण कामात असून सिडको उड्डाणपुलाखाली आमचे ट्राफिक कर्मचारी असून त्याठिकाणी उर्वरित साहित्य पाठवून द्या म्हणाला. त्याचे पैसे माझ्या माणसांना घेऊन पाठवितो, अन्यथा माझी पत्नी पैसे घेऊन येईल, असे म्हणाला. विश्‍वास बसावा म्हणून आरोपीने माझी पत्नी शाळेत पालक सभेला गेल्याचे सांगत पैशांबद्दल विश्वासात घेतले. ५ जुलैरोजी फिर्यादीने स्वतः संबंधित फोनवर संपर्क केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले.आरोपी देशमुख याने संबंधित नावाने अनेकांच्या फसवणुका केल्याचे समोर आले आहे. या नावाने जर कोणाच्या फसवणुका झाल्या असतील, तर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क करावा.-राजश्री आडे, निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज येथे करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending