September 21, 2024

काय बोलता? केंद्रीय मंत्री कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज!

0
Contact News Publisher

चक्क केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज केल्याने चर्चेचा विषय बनला आहे. मुंबईच्या म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी कराड यांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून कराड यांनी अर्ज केला आहे. सोबतच आमदार आमश्या पाडवी, गडचिरोलीचे माजी आमदार हिरामण वरखडे, भाजप आमदार नारायण कुचे यांनीही मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज केले आहेत.

खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

ऐकावे ते नवलचं !! प्रेयसींला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी तब्बल ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

लोकप्रतिनिधी यांना म्हाडाच्या सोडतीत आरक्षण कशाला असा प्रश्न उपस्थित करत याला काही दिवसांपूर्वी विरोध करण्यात आला होता. विशेष म्हणजे अनेकांना मुंबईत घर असून, देखील त्यांच्याकडून म्हाडाच्या घरासाठी अर्ज केले जात असल्याने हा विरोध करण्यात आला होता. दरम्यान अशात आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी चक्क केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी अर्ज केला आहे. कराड यांनी अर्ज केलेल्या मुंबईच्या ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील 142.30 चौ. मीटर क्षेत्रफळाचे हे घर आहे. या घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाख 94 हजार 267 रुपये आहे. तर कराड यांनी हे अर्ज लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून केला आहे.

औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदावर डॉ. मिलिंद दुसाने रुजू; मुकुंद चिलवंत यांची सिधुदुर्ग येथे बदली

ऐकावे ते नवलचं !! प्रेयसींला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी तब्बल ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास २२ जुलैपर्यंत मुदत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending