September 21, 2024

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा; घरात दिली फाशी, मृतदेह फेकला घाटात

0
Contact News Publisher

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने पत्नीने चक्क आपल्या पतीचा प्रियकर व त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी, प्रियकरासह अन्य दोघांवर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा पोलिसांनी अटक केली आहे. राजू मेहेर (पळशी ता.सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी गणेश महेताब मेहेर (वय ३२, रा.पळशी (ता.सिल्लोड), करण नारायण बारवाल (वय २०,रा.आडगाव ता.भोकरदन, ह.मु.सिल्लोड) यांना ताब्यात घेतले. तर रेणूकाबाई मेहेरसह अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पळशी येथील रेणुकाबाई मेहेर या महिलेने सिल्लोड ग्रामीण ठाण्यात १५ जुलै रोजी पती राजू मेहेर १० जूनपासून पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

Requirement Forest bharti : वनविभागामध्ये सर्वात मोठी भरती; येथे क्लिक करुन अर्ज करा

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला. सायबर सेलची मदत घेऊन मृत व संशयित आरोपींची माहिती घेतल्यानंतर पोलिसांचा याप्रकरणी संशय बळावला. यामुळे त्यांनी संशयित आरोपी गणेश मेहेर यास ताब्यात घेऊन गुरुवारी सखोल चौकशी केल्यानंतर खुनाची घटना समोर आली.मृत राजू मेहेर यास पत्नी व आरोपीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने पती, पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे सदर महिलेने आरोपीस याबाबत माहिती दिली. यानंतर त्यांनी मिळून राजूच्या खूनाचा कट रचला. यासाठी आरोपीने अन्य मित्रांची मदत घेऊन राजू मेहेर यास कामासाठी बाहेर जाण्याचे सांगत दुचाकीवरून सिल्लोड येथे आणले. सोबत असलेल्या मित्रांसह तिघांनी मद्य प्राशन केले. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपीच्या सिल्लोड येथील एका नातेवाइकांच्या रिकाम्या घरी जाऊन राजूला फाशी देऊन त्याचा खून करण्यात आला.

दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!; समजून घ्या..

ऐकावे ते नवलचं !! प्रेयसींला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी तब्बल ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

 

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, कर्मचारी सचिन सोनार, यतीन कुलकर्णी, कडुबा भाग्यवंत, रविकुमार भारती, सचिन काळे, संजय आगे, राजू काकडे, कैलास व्दारकूंडे, वैजिनाथ चव्हाण, योगेश तरमाळे यांच्या पथकाने केली.

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

मंगळसूत्र चोरास अटक, ८ गुन्हे उघड, टोळीतील तीन साथीदार फरार; सराफाच्या ताब्यातून चोरीचे सोने केले जप्त

 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट एका व्रत संस्थाच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. औरंगाबाद क्राईम टाईम्सच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व औरंगाबाद क्राईम टाईम्स स्वीकारत नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending