September 21, 2024

खुलताबाद तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी बंडू आव्हाड तर उपाध्यक्षपदी कुलकर्णी; नवीन कार्यकारणी जाहीर

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो

खुलताबाद तालुका तलाठी संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे तलाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी व जिल्हा अध्यक्ष सतीश भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या तालुकाध्यक्षपदी बंडू आव्हाड तर तालुका उपाध्यक्षपदी के सी कुलकर्णी व कार्याध्यक्षपदी दत्तू शेलार तालुका सरचिटणीस पदी प्रकाश बंड, सचिवपदी एनटी पठ्ठे, महिला उपाध्यक्षपदी माधवी हिवसकर कोषाध्यक्षपदी शिवाजी सोळुंके संघटक पदी कल्पना डिघोळे महिला प्रतिनिधी उज्वला वाघमारे सल्लागार विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नवीन कार्यकारणीला तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे यावेळी तलाठी सचिन भिंगारे, नामदेव कचनुरे व तालुक्यातील तलाठी व पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending