September 21, 2024

पी.एम.किसान योजना 14व्या हप्त्यासाठी १५ऑगस्ट पूर्वी पूर्तता करा; लाभार्थ्यांचे हाल; प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

0
Contact News Publisher

पी एम किसान योजना १४व्या हप्त्यांपासून वंचित शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता १५ऑगस्ट पूर्वी करून घ्यावी जेणेकरून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांपैकी पुन्हा कोण्ही वंचित राहणार नाही, १५ऑगस्ट रोजी उर्वरित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता वर्ग करण्यात येईल- कृषिमंत्री धनंजय मुंडे

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख

प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीच्या १४व्या हप्त्यांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यां प्रकरणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे शेतकऱ्यांच्या तृट्या (समस्या) जाणून घ्या, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना १४व्या हप्त्यांचा लाभ १५ ऑगस्ट पूर्वी द्यायचा अश्या सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असले तरी खुलताबाद तहसील कार्यलयात पी एम किसान सम्मान निधी योजना संदर्भात येणाऱ्या तक्रारीकडे मात्र तहसीलदार स्वरुप कांकळ मात्र दुर्लक्ष करीत आहेत.

विशेष म्हणजे दररोज खुलताबाद तहसील कार्यलयात शेतकरी पी एम किसान सम्मान निधी योजना विषयी तक्रारी घेऊन येतात मात्र तहसील कार्यलयात आल्यावर पी एम किसान निधी विषयी विचारपूस करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तासनतास बसावे लागते, योगायोगाने भेटले तर कोणतेही सहकार्य केले जात नाही, उडवाउडवीचे उत्तर दिले जातात आशा तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरील प्रकरणांची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहेत जेणेकरून प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पासून लाभार्थी वंचित राहणार नाही कारण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी १५ऑगस्ट पूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सूचित केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending