September 21, 2024

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी विजय चौधरी

0
Contact News Publisher

खुलताबाद येथील ज्येष्ठ पत्रकार तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे खुलताबाद तालुका संघटक विजय चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली असून जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्या मान्यतेने जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र दिले आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मुदत २ ऑगस्ट २०२५ पर्यंत, तीन वर्षे राहणार आहे.

 

सन २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य म्हणून ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मधुकर अण्णा वैद्य, धनंजय मुळे, विजय चौधरी, जयश्री एकबोटे, संगीता धारूरकर यांची निवड ही तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक होणार आहे. ग्राहकांना आपल्या समस्या सोडविण्याचे माध्यम म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद काम करत असते. सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणी तक्रारी शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय २९ ऑगस्ट २०२२ अन्वये ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ च्या कलम ६ व ८ नुसार दिलेल्या अधिकारानुसार जिल्हास्तरावर ग्राहकांच्या अधिकारांच्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर २ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्राहकांनी आपल्या समस्या 94 22 70 52 80 या क्रमांकावर संपर्क साधून मांडाव्यात. या बैठकीत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले.

विजय चौधरी हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या एकतीस वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्राहक
ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत खुलताबाद तालुका संघटक, तालुका अध्यक्ष, प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, बहि:शाल व्याख्याता
म्हणून काम पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ग्राहक चळवळीत काम करत ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी, तसेच राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९७ मध्ये खुलताबाद येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य सुरू केले. “बहि:शाल व्याख्याता” म्हणून ग्राहक प्रबोधनाचे काम केले. ग्राहक हितासाठी जनजागृती, प्रचार, प्रसार, सामाजिक, वृत्तपत्रात लिखाण करून जनजागृती केली. जागतिक ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळावा, ग्राहकांचे प्रबोधन, ग्राहक जनजागृती, ग्राहक जागर, ग्राहक सेवा मार्गदर्शन. वाद पूर्व लोकन्यायालयात पॅनल सदस्य म्हणून काम केले आहे. यापूर्वी विजय चौधरी यांनी सन १९९९ ते २००१ या कालावधीत जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षावर अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. विजय चौधरी अभ्यासू पत्रकार आणि ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपले एक वेगळे स्थान मिळविले आहे. ग्राहकांना न्याय मिळून देण्यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. विजय चौधरी यांच्या सुयोग्य निवडीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात असून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

डॉ.मझहर खान’च्या एन्ट्री’ने गंगापूर-खुलताबादचा राजकीय वातावरण तापणार; खासदार इम्तियाज जलील यांची घेतली भेट

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending