September 21, 2024

आदर्श घोटाळा लपवणाऱ्या उपनिबंधकास अटक; सहा दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी..

0
Contact News Publisher

आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळा सात वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता तर हजारो नागरिकांचे पैसे वाचले असते. मात्र, तीन वर्षांचे ऑडिट लपवून घोटाळ्यावर पांघरूण घातल्याच्या आरोपावरून जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५७) याला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. खरे हा नाशिक येथे सध्या उपनिबंधक आहे. चौकशीसाठी त्याला पोलिसांनी बाेलावले होते. चौकशीदरम्यान त्याच्यावरील संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला जागीच अटक केली. न्यायालयाने त्याची सहा दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

एक लाखात एक कोटीचा पाऊस पाडतो म्हणून फसवणारा भोंदूबाबा ताब्यात!

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालकासह ५० जणांवर गुन्हा दाखल केला. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अंबादास मानकापे हर्सूल कारागृहात आहे. पतसंस्थेच्या आॅडिटमध्ये अनियमितता आढळली असताना कारवाई केली नाही. २०१६ ते २०१८ या कालावधीत घोटाळ्यात सहभागी असल्यावरून जिल्हा उपनिबंधकाला पोलिसांनी अटक केली. सतीश खरे हा २०१६ ते २०१८ या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा उपनिबंधक होता. त्या वेळी आदर्श नागरी पतसंस्थेच्या शाखांमधून विनातारण कर्ज वितरित केले होते. त्यानंतर ३ ऑडिटरच्या माध्यमातून पतसंस्थेचे ऑडिट केले होते. त्या लेखापरीक्षणाचा विशेष अहवाल निबंधक कार्यालयात सादर करणे अपेक्षित होते. ते लेखा परीक्षकांनी केले नाही.

डॉ.मझहर खान’च्या एन्ट्री’ने गंगापूर-खुलताबादचा राजकीय वातावरण तापणार; खासदार इम्तियाज जलील यांची घेतली भेट

विशेष म्हणजे या लेखापरीक्षकांवर कारवाई करणे अपेक्षित होते, पण खरे याने ऑडिटर व पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई न केल्याने घोटाळा झाला. दरम्यान, नामदेव कचकुरे व सुनील मानकापे यांना न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा पोलिस कोठडीत पाठवले. वनिता मानकापे व सुनंदा मानकापेंचा जामिन अर्ज फेटाळला.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार, खातेदार यांना पोलीस आयुक्तालयांचे आवाहन

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मुलाची निर्घृण हत्या, बेदम मारहाण करून फेकले पाण्यात

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending