मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला एमआयएम पक्षाचा पाठींबा- खासदार इम्तियाज जलील
आपआपले आस्थापने बंद करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एमआयएम कडून करण्यात आले आहे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे लोकशाही मार्गाने मराठा बांधव आंदोलन करत होते. त्यांच्यावर अमानुषपणे बेछूट लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषीं पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी सोमवार, दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा व इतर ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे.
घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचा
जाहीर पाठींबा आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची सरकारने त्वरीत पूर्तता करावी.
सर्वसामान्य नागरीकांनी आपआपले आस्थापने बंद करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.