September 21, 2024

अल्पवयीन मुलीची घाटीत प्रसूती, प्रियकराने दिला धोका; वाचा 2 राज्यातील क्राईम कहाणी- औरंगाबाद

0
Contact News Publisher

औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घाटीत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून हा गुन्हा मध्य प्रदेशातील निवाली (ता. शेंदवा, जि. बडवाणी) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लोकेश आसाराम सोळुंके (वय 23 वर्षे) असे प्रियकराचे नाव आहे.

यात पीडिता मध्य प्रदेशातील आहे. दहावीत असताना तिची लोकेश सोळंके सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात पीडितेच्या मैत्रिणीच्या किरायाच्या खोलीत दोघांच्या भेटी होऊ लागल्या. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आल्याने पीडिता गर्भवती राहिली. ही माहिती तिने लोकेशला दिली असता, आपण पोलिस भरतीचा पेपर देणार आहे. त्यानंतर लग्न करतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तो पीडितेकडे फिरकलाच नाही.

दरम्यान, पीडिताने लोकेशची तीन महिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो काही परत आला नाही. या काळात तिचा गर्भ आठ महिन्यांचा झाल्यावर अखेर आई-वडिलांनी तिला बाळंतपणासाठी बहिणीकडे औरंगाबादेत पाठविले. तर, तिच्या बहिणीने 19 सप्टेंबरला तिला घाटीत दाखल केले. तेथे तिचे नाव आणि वय नोंदविल्यानंतर ती 18 वर्षे 1 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. 18 व्या वर्षीच बाळंतीण होत असल्यामुळे अल्पवयीन असताना ती गर्भवती राहिली, हे स्पष्ट होताच डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन आकाश सोळंकेविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, अत्याचाराची घटना मध्य प्रदेशात घडली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलीस करणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending