September 21, 2024

खुलताबाद- जर जरी जर बक्षच्या ७३७व्या उर्सची संदल मिरवणुकीने सुरुवात

0
Contact News Publisher

खुलताबाद येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा शेख मुन्तजीबोद्दीन जर जरी जर बक्ष रह यांचा ७३७व्या उरुसाला शनिवारी संदल मिरवणुकीने सुरुवात झाली आहे.

संदल मिरवणूक हि फर्श मोहल्ला येथे वडाची आळी, जुने बस स्टँड, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हजरत खाजा मुन्तजोबोद्दीन जर जरी जर बक्ष रह दर्गाह पर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहेला मिळाली आहे.

महाराष्ट्रातील हिंदू मुस्लीम ऐकते प्रतिक म्हणुन संपूर्ण भारतात उर्स प्रसिद्ध असुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात.

हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष यांचे मोठे बंधु हजरत ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब अवलियाॅ यांच्या दर्गाहतुन संदल मिरवणूक काढण्यात आली हि मिरवणूक काढत्यावेळी मौलानांनी फातेहा (धार्मिक विधी) करुन विश्वशांती करिता दुआ करण्यात आली. या मिरवणुकीत ऊर्स समितीचे सचिव विक्रम दराडे ,सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, ॲड एस एम कमर, कमेटीचे अध्यक्ष एजाज अहमद सुलतान अहमद, सदस्य कामरानोदीन, हबीब टेलर, मोहम्मद अबरार, मोहम्मद इमरान, मोहम्मद नईम बक्ष, युसूफ चिराजोद्दीन, मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, मोहम्मद मतीन जहागीरदार, मुजीबुद्दीन, जियाओद्दीन चिश्ती, पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे, बावीस ख्वाजा दर्गाह हद्दे खुल्द कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, नवाब खमरोद्दीन, आबेद जहागीरदार, शफीयोद्दीन चिश्ती, मुजीबोद्दीन हाफिजोद्दिन, रईस जहागीरदार , अनिस जहागीरदार सालेमोहम्मद, रईस मुजावर ,मुजीबुर रहेमान, शहराध्यक्ष समद टेलर, माजी नगरसेवक मकसुद अली कादरी, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र बोचरे , अंकुश भराड, अशोक भंडारे युसुफ बेग, कासिम बेग, गणेश रोटे, सतीश भालेराव, खास पटेल ,अशोक जगताप, यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी संदल मिरवणुक उपस्थित होते.

खुलताबाद येथील उर्स स्थळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केली पाहणी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending