September 21, 2024

जर जरी जरबक्ष उर्स निमित्त दर्गाह कमेटी तर्फे तालुका प्रशासनाचा सत्कार

0
Contact News Publisher

खुलताबाद येथील दर्गाह हजरत ख्वाजा मुन्तजीबोद्दीन जरजरी जरबक्ष रहे यांचा ७३७ वा उर्स सुरू असुन उर्स निमित्ताने सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या उर्साला विशेष व्यवस्था करण्यासाठी विविध भागातील अधिकारी विशेष सहकार्य लाभले असुन याबद्दल दर्गाह कमेटी वतीने सत्कार करण्यात आले.

यावेळी तहसीलदार तथा उर्स व्यवस्था समिती अध्यक्ष स्वरूप कंकाळ ,मुख्याधिकारी तथा उर्स व्यवस्था समिती सचिव विक्रम दराडे ,पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे ,मुख्याधिकारी (कन्नड) भुमे,मुख्याधिकारी (फुलंब्री) ऋषीकेश,उप पोलीस निरीक्षक विजय वाघ,प्रशासन प्रमुख अंकुश भराड पाटील ,पाणीपुरवठा विभागाचे अशोक भंडारे यांच्या सत्कार दर्गाह हद्दे कला कमेटी वतीने सत्कार करण्यात आला .

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा दर्गाह कमेटी सदस्य ॲड कैसरोद्दीन यांनी सांगितले की सुफी संतानी प्रेम सद्भावना एकतेचा संदेश दिला याच कारणास्तव संपुर्ण महाराष्ट्रतुन नव्हे तर संपूर्ण भारतातून मोठ्या लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन येत असतात .

तहसीलदार तथा उर्स व्यवस्था समिती अध्यक्ष स्वरूप कंकाळ यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारीनी सहकार्य केले याबद्दल सर्वाचे आभार मानले .
यावेळी दर्गाह हद्दे कलाँ कमेटी अध्यक्ष मोहम्मद एजाज अहमद सुलतान ,दर्गाह कमेटी सचिव मतिन जहागीरदार,उपाध्यक्ष इम्रान जहागीरदार ,सदस्य सालेह मोहम्मद ,मुबशीरोद्दीन ,कामरानोद्दीन गुलाम मोईनोद्दीन ,हबीब टेलर ,मोहम्मद युसूफ ,अबरार अहमद ,मोहम्मद नईम बक्ष ,नाजीमोद्दीन,शमसोद्दीन,हाजी मिनहाजोद्दीन,मोहम्मद जाफर ,आदी उपस्थित होते सुत्रसंचालन मुस्ताक अहेमद यांनी केले तर आभार मतीन जहागीरदार यांनी मानले .

चौकट -झीशान बुऱ्हानी यांनी शहरातील सुफी संत दर्गाह बाबतीत युट्यूब चैनल वर माहिती प्रसिद्ध करुन या चैनल चे दोन लाख फारोवर्स झाले असुन त्याबद्दल सिल्व्हर पदक मिळवून याबद्दल तहसीलदार तथा दर्गाह कमेटी अध्यक्ष स्वरूप कंकाळ यांनी सत्कार करून अभिनंदन केले .

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending