September 21, 2024

खुलताबाद पोलीसांनी मोटरसायकल चोर पकडले; तीन मोटरसायकला जप्त

0
Contact News Publisher

सुलीभंजन ता खुलताबाद येथील सय्यद इब्राहिम सय्यद आमीर यांची HF डिलक्स मोटार सायकल क्र. MH 20-FQ-9606 हि त्याचे घरा समोरुन दि.26/8/2023 रोजी चोरी झाली होती त्याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे खुलताबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास करीत असतांना त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, चोरी गेलेली मोटार सायकल हि मालेगाव येथील काही मुलांनी खरेदी करुन वापरत आहे त्यावरुन त्यांचा शोध घेत मालेगाव येथुन आरोपी नामे १)आसीफ अली सलीम अली २)शकील खान जाकीर खान उर्फ राजु ३) कुरैशी मुजाहिद अहेमद अब्दुल अजीज ४) सय्यद समीर सय्यद रौफ सर्व रा मालेगाव जि नाशिक येथून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली व त्यांचेकडून HF डिलक्स मोटार सायकल क्र. MH 20-FQ-9606 हि जप्त करण्यात आली. तपासा दरम्यान त्यांनी सदर मोटार सायकल हि पडेगाव येथील शेख सिराज शेख सईद व आंबिवली, कल्याण जि ठाणे यांच्याकडून खरीदी केल्याचे सांगितले सदरील दोन्ही मुख्य आरोपींना सापळा रचुन खुलताबाद उर्स मैदान येथुन व रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथुन ताब्यात घेण्यात आले.

त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आनखी दोन मोटार सायकली चोरी केल्याची व दौलताबाद येथील मेडीकल फोडल्याची कबुली दिली आहे त्यांचेकडून HF डिलक्स मोटार सायकल क्र. MH 20-EW-4166, व क्र. MH 20-EQ-5517 ह्या जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक श्री सुनिल लांजेवार, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, सपोनि/अमोल ढाकणे, पोलीस हवालदार जाकेर शेख, किशोर गवळी, सिद्धार्थ सदावर्ते,विशाल भालेराव यांनी केली आहे.

आंबिवली, कल्याण जि ठाणे येथील शेख सोहेल शेख मझहर यांनी व त्याचा साथीदार शेख सिराज यांनी मोटार साायकली चोरी करुन विक्री केल्या इतर आरोपी हे न्यायालयीन कोठडी असुन शेख सोहेल हा ०२ दिवस PCR मध्ये आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending