September 21, 2024

मोफत तपासणी शिबिरात अडीच हजार रुग्णांनी घेतला लाभ; आमदार सतीश चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम

0
Contact News Publisher

खुलताबाद- भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान व एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुलताबाद तालुक्यातील नागरिकांसाठी गुडघे दुखी व कंबर दुखी आजारासंदर्भात वेरुळ येथील विश्वकर्मा मंदिरात 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. चार दिवसांत तालुक्यातील 2500 हुन अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी एक हजार, दुसऱ्या दिवशी 500, तिसऱ्या दिवशी 600, चौथ्या दिवशी 400 हुन अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यामधील जवळपास 950 हुन अधिक रुग्णांचे मोफत एक्स रे काढण्यात आले होते. मुंबई येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.अबी तुरब चुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.15) सदरील शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी शिबिराचे आयोजक आमदार सतीश चव्हाण, एमजीएमचे अधिष्ठाता डॉ.आर.बी.बोरा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, महेश उबाळे, सुनीता आहेवाड, गजानन फुलारे, वसंतराव नलावडे, अजीम मनियार, नईम शहा, इंद्रिस पटेल, भगवान कामठे, प्रकाश नलावडे, ज्ञानेश्वर दुधारे, विनोद जाधव, अजिनाथ साळुंके, ज्ञानेश्वर मातकर, रावसाहेब फुलारे, नईम पटेल, नानासाहेब चंद्रटीके, केशव जाधव, आदीब शेख, रियाज शेख, हरिदास राठोड, भाऊसाहेब जाधव, मदन राठोड, जावेद पटेल, इब्राहिम शहा, प्रवीण निकम, अक्षय नलावडे, इरफान पठाण, अक्षय नलावडे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, आज असंख्य नागरिकांना गुंडघे दुखी, कंबर दुखी अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी लागणारा लाखो रूपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य समस्येमुळे होणारी परवड टाळता यावी म्हणून गुडघे दुखी व कंबर दुखी आजारासंदर्भात हे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबारातील गरजू रुग्णांवर पुढील उपचार देखील मोफत करणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

डॉ.आर.बी.बोरा यांनी रुग्णांनी आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार करण्याचा सल्ला दिला. तर डॉ.अबी तुरब चुनिया यांनी आ.सतीश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या शिबरीचे कौतुक करत यापुढे देखील आपण खुलताबाद तालुक्यातील नागरिकांना रुग्ण सेवा देण्यासाठी उपलब्ध राहू असे उपस्थित रुग्णांना आश्वस्त केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending