आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाला यश!; गंगापूर-खुलताबादच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 71कोटी मंजूर
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नावेद शेख
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ७१ कोटी ५७ लाख ३७ हजार एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पाठपुरावा केला. या निधीतून रेल्वे पूल, रस्त्यावरील लहान पूल व प्रशस्त रस्ते अशी विकास कामे केली जाणार आहेत.
मंजूर कामात लासूर स्टेशन येथे रेल्वे उड्डाण पूल (१७ कोटी ३९ लाख), देवगाव, गंगापूर लासूर रस्त्यावर गट क्र. ३४ लासूर स्टेशन येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाकरिता पोच रस्त्याची भुसंपादनासह दुरुस्ती करणे (१० कोटी), काटेपिंपळगाव लासूर डोणगाव दिवशी रस्ता दुरुस्ती (७० लाख), वैरागड, बाभूळगाव, डोणगाव टाकळी जांभाळा रस्ता दुरुस्ती (७ कोटी ५० लाख), वाळूज कमळापूर- घाणेगाव-नारायणपूर-कासोडा रस्ता काँक्रिटीकरण करणे
(१०कोटी), वाळूज-रामराई-इटावा एकलहेरासिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम व पूल (३ कोटी ५० लाख), ढोरेगाव-सावखेडा- वाळूज-लांझी रस्ता दुरुस्ती (९ कोटी), गाढेपिंपळगाव, वाहेगाव, मांजरी, संजरपूर रस्ता दुरुस्ती (४ कोटी ८० लाख), गाढेपिंपळगाव, वाहेगाव, मांजरी, संजरपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम (२ कोटी), खुलताबाद- लामणगाव-टाकळी राजेराय रस्ता डांबरीकरण व पुलाचे बांधकाम (३ कोटी ४४ लाख ५२ हजार), हर्सल जटवाडा रस्ता रुंदीकरणासह दुरुस्ती (१ कोटी), खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर, शिरोडी रस्ता दुरुस्ती (१ कोटी), खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी शिरोडी रस्ता दुरुस्ती (५० लाख) या कामांचा यात समावेश आहे.