September 21, 2024

महाराष्ट्रातील सर्व सरपंचाचे राजीनामे घेऊन पदे रद्द..; सरपंच संदीप निकम यांची मागणी

0
Contact News Publisher

सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांचा मनमानी कारभार

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख

ग्रामपंचायत ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी महत्त्वाची संस्था असुन तिथे गावातील विकास कामे तसेच महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. तेथे निवडून जाणारे सर्व सदस्य हे लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करुन गावाच्या विकासाचे निर्णय घेत असतात. परंतू अलिकडच्या काळात ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हे तेथील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर काही ठराव व नाहरकत प्रमाणपत्रे देत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, सरपंच तसेच लोकनियुक्त सदस्यांना काहीही किंमत राहीलेली नाही किंवा हे देत नाहीत.

 

जर सरपंच, उपसरपंच व सदस्यांना न विचारात घेता निर्णय होत असतील तर या पदांना काय महत्त्व आहे. त्यामुळे त्यांची राजीनामे घेणे योग्य वाटते व सर्व अधिकार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात यावे असे माझे मत आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वच सरपंच, उपसरपंच व सदस्य त्रस्त असुन त्यांना ग्रामपंचायत कारभारामध्ये काहीही स्वास्थ्य वाटत नाही. करिता विनंती की, महाराष्ट्रातील सर्व सरपंचाचे राजीनामे घेऊन पदे रद्द करण्यात यावीत.अशी मागणी खुलताबाद तालुक्यातील सरपंच संदीप निकम यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending