September 23, 2024

*औरंगाबाद जिल्ह्यात आज इतके रुग्णांची वाढ 494 रुग्णांवर उपचार सुरू*

0
Contact News Publisher

*औरंगाबाद जिल्ह्यात आज इतके रुग्णांची वाढ 494 रुग्णांवर उपचार सुरू*

औंरगाबाद, दि.31 (जिमाका) :

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे. यापैकी 976 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 70 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 494 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1), गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1), नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1), जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1), अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), अन्य (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 18 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

*घाटीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील 52 वर्षीय महिला रुग्णाचा 30 मे रोजी सायं.5.20 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर खासगी रुग्णालयात 10, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 70 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
******

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending