राष्ट्रवादीची ताकद वाढणार ; जयंत पाटील एमआयएमचा करणार ‘करेक्ट कार्यक्रम’

0
MIM-NCP-Correct-Program-Maharshtra-Today
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद :- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमची राष्ट्रवादीकडून कोंडी करण्यास सुरुवात झाली असून समोरही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) एमआयएमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ (Correct Program) करणार असल्याची माहिती आहे.

यंदा पार पडणाऱ्या औरंगाबाद निवडणुकीत राष्ट्रवादी सुद्धा ताकदीने उतरणार आहे. यासासाठी राजकीएमआयएमय हालचालींना वेग आला असून आतापर्यंत राष्ट्रवादीकडून एमआयएमचे अनेक नेते फोडण्यात आले. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटील प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता चक्क एमआयएमला आपल्या टप्प्यात घेतलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत एमआयएमला मोठे धक्के बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून एमआयएमला गळती लागली आहे. माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलं आहे. आजही अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *