September 22, 2024

विहिरीत तलाठी चा मृतदेह आढळला; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

0
Contact News Publisher

धक्कादायक बातमी-  विहिरीत तलाठी राहुल अशोक पांडे यांचा मृतदेह आढळला

  • सिल्लोड – क्राईम टाईम्स ब्युरो

दि.6, सिल्लोड तालुक्यातील अन्वी सजाचे तलाठी राहुल अशोक पांडे यांचा मृतदेह शहरातील सपकाळ वाडी परिसरातील विहिरीमध्ये आढळून आला.  त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील सपकाळ वाडी येथील वाल्मिक ऋषी मंदिर जवळील विहिरी मध्ये एकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांनी पहिले . विहिरीजवळ तलाठी राहुल पांडे यांची मोटारसायकल ( बेलेट ) क्रमांक महा 20 एफ .डी. 0779 दिसून आल्याने सदर मृतदेह हा तलाठी राहुल पांडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पांडे यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

राहुल पांडे यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे कारण अध्याप कळालेले नाही. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सर्वांना परिचित तसेच तरुण पणातच तलाठी राहुल पांडे यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची  माहिती मिळतात पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending