September 23, 2024

भारतीय हवाई दलात नोकरीची संधी, परीक्षेचे नोटिफिकेशन जारी; ३१७ जागांवर भरती

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने सामान्य प्रवेश परीक्षा २०२२( Indian Air Force Recruitment 2022) साठी ३१७ जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या नोटिफिकेशननुसार ‘कमिशन्ड ऑफिसर’ या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या https://careerindianariforce.cdac.in/

किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत १ डिसेंबर ते ३० डिसेंबरच्याच्या दरम्यान आहे. भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार एकूण कमिशन्ड ऑफिसर पदाच्या ३१७ पदांवर भरती होणार आहे. यामध्ये अफकॅट एन्ट्रीद्वारे फ्लायिंगसाठी ७७ जागा, ग्राऊंड ड्युटीच्या १२९, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी १११ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
१) फ्लाइंग
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण व ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ६०% गुणांसह BE/B.Tech.

२) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : ५०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण (ii) ६०% गुणांसह BE/B.Tech.

३) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : (नॉन टेक्निकल): ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B. Com./ ६०% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

NCC स्पेशल एंट्री
४) फ्लाइंग
शैक्षणिक पात्रता : फ्लाइंग : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा
इंडियन एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा फ्लाईंग ब्रांच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९९ ते जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा. तर ग्राऊंड ड्युटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा. AFCAT एन्ट्रीसाठी २५० रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending