September 22, 2024

राष्ट्रवादी एमआयएमला घाबरली, इम्तियाज जलील यांनी डिवचले

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin-owaisi) यांची आज मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे. यासभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. यावरून राजकारण तापले आहे.एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ‘राष्ट्रवादी एमआयएमला घाबरली’ असा टोमणा मारून राष्ट्रवादीला डिवचले. पोलिसांवर नियंत्रण असलेले गृहखाते राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील (Dilip Wadse Patil) यांच्याकडे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएमकडून धोका असल्यामुळेच ओवैसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आली, अशी टीका जलील यांनी केली. यासंदर्भात गृहमंतरी दिलीप वळसे पाटील यांनी जलील यांचा दावा फेटाळून लावला. “एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो हे म्हणण बरोबर नाही. पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत आहेत” असे पाटील म्हणालेत.
दरम्यान, आज सकाळपासूनच असदुद्दीन ओवैसी हे मुंबईत आल्याची चर्चा आहे. आज सकाळीच मुंबईत ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचवेळी सभेसाठी औरंगाबादयेथून इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोटारींचा ताफा निघाला आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणालेत की “मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जमावबंदी लागू केली आहे. मुंबईत कोणत्याही प्रकारच्या सभा, मोर्चांना बंदी घातली आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे की, मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात काही घटना घडल्या आहेत. त्याची काळजी घेऊन हे टाळायला हव.”

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending