September 22, 2024

जलील यांची ठाकरे सरकारला मोठी ऑफर; एमआयएम महापालिका निवडणूक लढणार नाही

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जलील यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. एकीकडे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारने मुस्लिम आरक्षण जाहीर केले, तर दुसरीकडे एमआयएम महापालिका निवडणूक लढवणार नाही, अशी मोठी घोषणा जलील यांनी केली आहे.

निवडणूक लढणार नाही
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली. एमआयएमने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलताच विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने मुस्लीम आरक्षण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली. त्याशिवाय राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाही. या सरकारने मुस्लिम आरक्षण दिले नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धरणे आंदोलन करू, असा इशाराच जलील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
दरम्यान, आता इम्तियाज जलील यांची ऑफर ठाकरे स्वीकारणार का? भविष्यात मुस्लिम आरक्षणाची घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे असून मुस्लिम आरक्षणावरून राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending