September 22, 2024

… तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

0
Contact News Publisher

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी सध्या भिती नाही, पण काळजी घेतली पाहिजे. राज्यात आधी रोज पाच-सहाशे रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० वर गेली आहे.

  • क्राईम टाईम्स टीम

मुंबई : देशभरात आणि राज्यातही नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. नाताळचीही धूम आहे. यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होते आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला व बजावले की, निर्बंध पाळले नाहीत तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते.

कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनची गरज भासणार आहे. प्रसंगी ऑक्सिजनचा तुटवडाही भासू शकतो. ऑक्सिनच्या अनुषंगाने राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे ते म्हणालेत.

काळजी घ्या
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी सध्या भिती नाही, पण काळजी घेतली पाहिजे. राज्यात आधी रोज पाच-सहाशे रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० वर गेली आहे. ओमिक्रॉनचे रुग्णही १०० च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.

एस.पी.साहेब, खुलताबाद-गंगापूरमध्ये मटका,वाळू,अवैध दारू,पत्त्यांचे क्लबसह अनेक अवैध धंदे सर्रास सुरू..!

खुलताबादेत घरकुल ‘ड’ यादी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; अकरा गावांचा समावेश; तुमचं नाव असेल तर..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending