अभिनेता सलमान खानला सर्पदंश, पनवेलच्या फार्महाऊसमधील घटना
- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : पनवेलमधीलमधील फार्महाऊसमध्ये अभिनेता सलमान खानला (salman-khan) सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे.सलमानला साप चावल्यानंतर त्याला पहाटे ३.३० वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती उत्तम असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (salman-khan-was-bitten-by-a-snake)
माहितीनुसार , ख्रिसमस आणि वाढदिवसानिमित्ताने सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर त्याला साप चावल्याची घटना घडली. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.