September 21, 2024

विजय चौधरी यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन २०२१ चे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये खुलताबाद येथील महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार विजय चौधरी यांना उत्कृष्ट वार्ता प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत बारा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात
उत्कृष्ट वार्ता गटामध्ये‍ प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे खुलताबाद तालुका प्रतिनिधी विजय चौधरी यांना अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पत्रकार विजय चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending