September 21, 2024

खुलताबाद पंचायत समितीच्या उपसभापती पदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद पंचायत समितीच्या माजी उपसभापती युराज ठेंगडे यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या आदेशानुसार उपसभापती पदांचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती गणेश नाना आधाने यांच्याकडे दिला होता सभापती गणेश नाना यांनी उपसभापती युराज ठेंगडे यांचा राजीनामा मंजूर केला होता त्यानंतर प्रशासकीय कार्यवाही नंतर आज उपसभापती पदाची निवडणूक जाहीर होऊन आज निवडणूक घेण्यात आली उपसभापती पदासाठी प्रभाकर शिंदे यांनी अर्ज दाखल केला मात्र इतर सदस्यांचे अर्ज दाखल न झाल्यामुळे प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवड झाल्यानंतर प्रभाकर सिंदे यांचा पंचायत समितीच्या समोर सत्कार करण्यात आला यावेळी सभापती गणेश नाना अधाने, दिनेश अंभोरे, ज्ञानेश्वर नलावडे, अझीम मणियार, प्रकाश वाकळ, प्रकाश चव्हाण, परसराम , अविनाश कुलकर्णी, सरपंच करण राजपूतसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

खुलताबाद – घरकुल प्रपत्र ‘ड’ यादी सर्वेक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक; ३८ गावांचा समावेश

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending