September 22, 2024

खुलताबाद – ३८ गावांतील घरकुल याद्या उपलब्ध; लाभार्थ्यांनो आजचं ‘हे’ काम करा..

0
Contact News Publisher

पंतप्रधान आवास घरकुल ड याद्या तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध झाल्या आहेत तर ग्रामपंचायतच्या संगणक चालककडे यादी पाहता येणार आहेत.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

पंतप्रधान आवास घरकुल योजनाच्या माध्यमातून खुलताबाद तालुक्यातील ३८ गावांत घरकुल ड यादीचे सर्वेक्षण सुरू झाले असून घरकुल साठी पात्र व अपात्र कुटूंबांचे स्थळ पाहणी करण्यासाठी प्रशासकीय समिती प्रत्येक गावांत येत आहेत तर समिती घटनास्थळी लाभार्थ्यांची स्थळ पाहणी पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यलयात सादर करणार आहेत.

समितीमध्ये कोण आहेत..!

पंतप्रधान आवास घरकुल योजनाच्या समिती मध्ये आपल्या गावांतील तलाठी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, संबंधित शाखा अभियंता या सर्व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे

तालुक्यातील ३८ गावातील घरकुल ड याद्या उपलब्ध झाल्या आहेत

पंतप्रधान आवास घरकुल ड याद्या तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध झाल्या आहेत तर ग्रामपंचायतच्या संगणक चालककडे यादी पाहता येणार आहेत.

लाभार्थ्यांनो आजचं ‘हे’ काम करा..

लाभार्थ्यांनी ताबडतोब संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना भेटून आपल्या नावांची शहानिशा करून ठरवलेल्या दिवशी उपस्थित राहून पंचनामा करून घ्यावा असे आव्हान पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गवळी यांनी केले आहेत.

घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending