September 22, 2024

आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात PWD चा., थातुरमातुर काम करून बिल उचलण्याचा डाव

0
Contact News Publisher

आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

राज्यभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रोखठोक भूमिका घेऊन सतत बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठिशी घालून निष्कळ दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा दावा विधानभवनात करणारे गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रशांत बंब आता यांच्याच मतदार संघात खुलताबाद सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून तालुक्यातील औरंगाबाद जटवाडा ते काटशेवरी फाटा, टाकळी राजेराय, खुलताबाद ते फुलंब्री, टाकळी राजेराय ते लामंनगावं फाटा, झरी फाटा ते बोडखा परिसर या ठिकाणी बांधकाम विभागाच्या वतीने अंदाजे कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असून सदरील काम अत्यंत निष्कळ दर्जाचा होत असल्याचा आरोप झरी येथील सरपंच करणं राजपूत यांनी केला आहेत तर सरपंच करण राजपूत यांनी व्हिडीओ चित्रीकरणात स्थळंपाहणी करून बांधकाम विभागच्या शाखा अभियंता व खुलताबाद उपविभाग मुख्य अभियंता यांना कामाची माहिती व माहिती दर्शविणारा माहिती फलक व काम किती दर्जाहीन होत असल्याचा निर्दशनास आणून दिला मात्र उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले म्हणून करण राजपूत यांनी सदरील चित्रीकरण आमदार प्रशांत बंब यांना पाठवून कामाची तक्रार केली आहेत.आता आमदार प्रशांत बंब काय कार्यवाही करणार याकडे झरी गावकऱ्यांचे व तालुक्याचे लक्ष लागले आहेत

आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

आमदार प्रशांत बंब राज्यातील दर्जाहीन कामाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करत असतात मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात खुलताबाद सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून तालुक्यात किती व कोणत्या ठिकाणी काम सुरू असून किती दर्जेदार काम होत आहेत यांची माहिती प्रत्यक्षात आमदार प्रशांत बंब घेणार का! याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहेत.

बांधकाम विभागचा चालढकलपणा

बांधकाम विभागाकडून तालुक्यात सुरू असलेल्या कामाचे परिपत्रक (स्टीमेंट) देण्यास नकार देण्यात येत आहेत तर बांधकाम उपविभागचे मुख्य अभियंता कार्यलयात उपस्थित राहत नाही दूरध्वनीवरून संपर्क साधला तर फिलवर असल्याचे बोलतात.

शाखा अभियंता यांना संपर्क केला असता फिल्व्हर असल्याचे सांगतात प्रत्यक्षात फिल्व्हर उपस्थित नसतात असे अनेकवेळा अनुभवले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending