September 23, 2024
Contact News Publisher

घरीच करा उपचार शासनाच्या आदेशाने खळबळ!

  • क्राईम टाईम्स ब्युरो

देशात अन राज्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यांच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा पाहता यापूढे सौम्य आणि काहीच लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर घरच्या घरीच उपचार करावेत असे आदेश शासनाने काढले आहेत त्यामूळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णासाठी आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

गेल्या दोन महिन्यात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा झपाटयाने वाढत आहे आजमितीस राज्यात 80 हजार पेक्षा जात रुग्ण आढळुन आले आहेत यातील पन्नस टक्के रुग्ण घरी सोडण्यात आले असले तरी दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने नवे आदेश शनिवारी काढले यानुसार यापुढे कोरोनाची अति लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नाहीत मात्र पॉझीटिव्ह टेस्ट आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे अति सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना घरीच वेगळया खोलीत ठेवावे त्यांची काळजी घेण्यासाठी सतत एक व्यक्ती घरात असावा या व्यक्तीक काळजी घेताना मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोज चा वापर करावा बाधित व्यक्ती वर बारीक लक्ष ठेवावे आरोग्य यंत्रणेच्या सतत संपार्कात रावे असे आदेश काढण्यात आले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending