पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र लाभार्थ्यांना घरकुल!; पंतप्रधानांकडे तक्रार |खुलताबाद

खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथील अर्फात शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या pmo तक्रार निवारण विभागकडे तक्रार कल
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायत येथील एका सामाजिक कार्यकर्ते अर्फात शहा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे तक्रार केली आहे पंतप्रधान घरकुल आवास योजनांसाठी बोडखा गावांत घरकुल यादी तयार करण्यात आली होती त्या यादी मधून पात्र कुटूंब वगळले आहेत पंचायत समिती विभाग कडून माहिती घेतली असता सदरील यादी जिल्हा विकास विभाग औरंगाबाद यांच्याकडून जाहीर झाली असल्याचे सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण घोषणा केल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा आहेत की प्रत्येक पात्र कुटूंबाला घरकुल मिळेल माझं आवर्जून निवेदन आहेत की गावातील ज्या लोकांचे नाव घरकुल यादीतून वगळण्यात आले आहेत त्या लोकांना घरकुल यादी मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात यावे. याप्रकरणी पंतप्रधान आवास योजना विभागकडून दखक घेण्यात आली असून सदरील तक्रारदार यांना नोटिफिकेशन पत्र देऊन कार्यवाही साठी आवास योजना सचिव मुकुल दिक्षित यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
घरकुलची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा